प्रशासन अधिकारी जगताप यांचा जामीन पुन्हा फेटाळला

Foto

छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : उच्चशिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी संजय मार्तंड जगताप यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायालयाने दुसऱ्यांदा फेटाळला. वेतन निश्‍चिती प्रस्तावासाठी लाच मागितल्याच्या गंभीर आरोपांखाली दाखल प्रकरणाचा तपास अद्याप प्राथमिक टप्प्यात असल्याने अटकपूर्व जामीन देणे योग्य ठरणार नाही, असे स्पष्ट निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.
या यापूर्वीही संजय जगताप यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज 16 जानेवारी रोजी दाखल केला होता. युक्तिवादा नंतर न्यायालयाने 17 जानेवारी रोजी न्यायालयाने जामीन फेटाळला होता. त्यानंतर पुन्हा एकदा संजय जगताप यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली. त्यावर 22 व 23 जानेवारी रोजी सुनावणी झाली. आरोपी प्रशासकीय जबाबदारीच्या पदावर कार्यरत असून त्याच्यावर लाच मागणीसारखे गंभीर आरोप आहेत. तपास अद्याप प्राथमिक अवस्थेत आहे. अशा परिस्थितीत अटकपूर्व जामीन दिल्यास तपास प्रक्रियेवर विपरित परिणाम होण्याची शक्यता आहे, असे निरीक्षण विशेष न्यायाधीश राजेश डी. पाटील यांनी नोंदवले. युक्तिवादाचा निकाल न्यायालयाने 28 जानेवारी रोजी जाहीर केला.